जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेत रायसोनी पब्लिक स्कूल “प्रथम”

0
32

साईमत जळगाव प्रतिनिधी

येथील एकलव्य क्रीडा संकुल स्क्वॉश कोर्ट येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे (प्रथम) यश अमित हेमनानी, (द्वितीय)आरुष अभय चौधरी, महर्षी सचिन जोशी, १७ वर्षांखालील मुलांच्या गटात देशराज कीर्ती मुनोत, यांनी या स्पर्धेत यश संपादन केले.

या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंची विभागीय शालेय स्क्वॉश स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या अनुशंगाने जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी विविध पारितोषिके मिळवत सदर स्पर्धेत वर्चस्व राखले आहे.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मीनल थोरात व एकलव्य क्रीडा संकुलचे स्क्वॉश प्रशिक्षक प्रवीण कोळे आदी उपस्थित होते. विजयी ठरलेल्या विध्यार्थ्यांचे जी. एच. रायसोनी इस्टीट्युटचे अध्यक्ष सुनील रायसोनी, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले. तर क्रीडाशिक्षक संजय चव्हाण यांचे या विध्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here