साईमत, प्रतिनिधी, जळगाव
येथे राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महाविद्यालयातील क्रीडापटूंचा सत्कार आयोजीत केला होता. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अंजली पाटील यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ॲकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा.डॉ. सौरभ गुप्ता, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाविका घाटे व अक्षया दानी या विद्यार्थिनींनी केले. क्रीडा विभागाचे राहुल धूळनकर व ममता प्रजापत यांनी सहकार्य केले.
या खेळाडूंचा झाला सत्कार
नचिकेत नरेंद्र ठाकूर (क्रिकेट), योगेश मनोहर साळुंखे (सॉफ्टबॉल),गोरव रामशिंग सोनवणे (बेसबॉल),आदित्य प्रभाकर पाटील (बेसबॉल),पंकज नारायण पाटील (फुटबॉल),सागर किशोर चौधरी (मल्लखांब), धनश्री राजीव जाधव (स्विमिंग),गौरी अजय चौधरी (क्रिकेट), योगेश मनोहर साळुंखे (बेसबॉल), आशिष बिबिसन गावित (फुटबॉल), रुची शरद भाटिया (सॉफ्टबॉल), कांचन शर्मा (बुद्धिबळ), भरत दिलीप चौधरी (स्विमिंग), अनिकेत नितीन चौधरी (तलवारबाजी), देवयानी सुभाष चौधरी (मल्लखांब),यशराज विद्याधर सोनवणे (बेसबॉल), निखिल गोविंद मिस्त्री (मिनी गोल्फ), राजरत्न मिलिंदकुमार गधे (रायफेल शूटिंग), जागृती हटकर (बास्केटबॉल), खुशबू हटकर (बास्केटबॉल).