रावेर तालुक्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

0
19

३० गावातील ४७१ शेतकऱ्यांचे नुकसान, तात्काळ नुकसान भरपाईची मागणी

साईमत/रावेर/प्रतिनिधी :

तालुक्यातील केळी व खरिपाची पिकांना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठया प्रमाणावर पुन्हा एकदा भुई सपाट केले आहे. तालुक्यातील ३० गावांच्या शिवारातील केळी, कापुस, मका, तुर, चवळी, उडीद, मुग याचे ४७१ शेतकऱ्यांच्या सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल व कृषी विभागातर्फे वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्याच्या शेती शिवाराला झोडपल्याने खिरोदे प्र, रावेर, रसलपूर, मुंजलवाडी, विवरे, बलवाडी, शिंगाडी, भामलवाडी, सिंगत, वडगाव, निंभोरा, ऐनपूर, निंबोल, मस्कावद, आभोडा खुर्द, जिन्सी, गुलाब वाडी, लालमाती आदी गावांसह ३० ते ४० गावांचा समावेश आहे. निसर्गच कोपल्याने तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. दरवेळी होत असलेल्या नुकसानीमुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

शेतकऱ्यांना शासकीय मदत कधी मिळेल?

केळी हे मुख्य पीक म्हणून घेतले जाते. दोन वर्षे कालावधीचे पीक असल्याने दरवर्षी बळीराजाचे नुकसान होत आहे. अनेकवेळा नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम झाले. मात्र, केळी नुकसानीची भरपाई म्हणून शासनाची मदत मिळाली नाही. विम्याची रक्कम त्वरित खात्यात थेट जमा झाली. परंतु ज्यांनी विमा काढलाच नाही. अशा शेतकऱ्यांना शासकीय मदत कधी मिळेल? असा प्रश्नही शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here