पाळधी बु.च्या उपसरपंचपदी राहुल धनगर बिनविरोध

0
12

साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर

पाळधी बु. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत राहुल सुभाष धनगर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विजय पाटील होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाळधीचे मंडळाधिकारी अमोल पाटील यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविस्तार अधिकारी दीपक पाठक यांनी सहकार्य केले. पहिल्या सभेस सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल राहुल धनगर यांचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जि. प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here