यावलला भाजपाच्या शहराध्यक्षपदी राहुल बारी

0
35

साईमत/ न्यूज नेटवर्क/यावल :

येथील खरेदी विक्री संघात शहरातील भाजपाच्या सर्व बूथ प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन तसेच यावल शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात शहराध्यक्षपदी राहुल पंढरीनाथ बारी, कार्याध्यक्ष किशोर भिकाजी कुलकर्णी तर महिला अध्यक्षपदी नंदा राजेंद्र महाजन यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

बैठकीच्या सुरुवातीस नवमतदार नोंदणी आणि ‘माझी लाडकी बहीण योजना’ प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच प्रयत्न करण्यासाठी डॉ.कुंदन फेगडे, पी.एस.सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीत राकेश फेगडे, शहराध्यक्ष राहुल बारी, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, हेमराज फेगडे, गोविंदा बारी, भूषण फेगडे, योगेश चौधरी, रितेश बारी, सागर चौधरी, डॉ.अभय रावते, सिद्धांत घारु, आकाश कोळी, कोमल इंगळे, मुकेश कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून संजय वसंत फिरके, मुकेश रमेश कोळी, सुनील काशिनाथ बडगुजर, योगेश वासुदेव वाणी, सिद्धांत राजू घारू, सरचिटणीसपदी योगेश विजय चौधरी, गोविंद मधुकर बारी तर चिटणीसपदी छोटू माधव कुंभार, दगडू गणू भील, रवींद्र सुपडू भालेराव, ललित वसंत परमार्थ, जालंधर वासुदेव कोळी, युवा मोर्चाच्या यावल शहराध्यक्षपदी विशाल बाळासाहेब शिर्के यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here