खडकदेवळा बु.ला भिल्ल समाजाच्या युवकाच्या मृत्यूवरून ‘राडा’

0
56

पोलीस पाटीलला जबर मारहाण, पोलीस निरीक्षकांसह पोलिसांना जमावाचा चोप
पोलीस वाहनाची फोडलेली काच रात्रीच्या रात्रीच बदलली?

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

तालुक्यातील खडकदेवळा बु.येथील शेतकऱ्याने जंगली जनावरांपासून पिकांचे नुकसान होऊ नये, म्हणून शेतात इलेक्ट्रीक तारांचा वीज प्रवाह सोडला होता. या इलेक्ट्रीक तारांचा शाॅक लागुन भिल्ल समाजाच्या एका ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. या घटनेममुळे त्या समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. घटनास्थळाची पाहणी करायला गेलेल्या गावाच्या पोलीस पाटील आणि पोलीस निरीक्षकांवर घटनास्थळी अज्ञात समुहाकडून दगडफेक करण्यात आली. त्यात पोलीस पाटील आणि पोलीस निरीक्षकांसह काही पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापत झाली. मात्र, पोलिसांनी आम्हाला मारहाण झाली नाही, अशी सारवासारव करून जमावाने पोलीस वाहनाची फोडलेली काच रात्रीच बदलवून टाकली आहे. शेतकऱ्यास अटक करून उशिरा पाचोरा पोलिसात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील खडकदेवळा बु. येथील धर्मराज श्रावण पाटील यांनी शेती कसण्यासाठी घेतली आहे. शेतात मका पेरला आहे. रात्री रान डुक्कर आणि जंगली प्राणी पिकात घुसुन पिकांचे नुकसान करू नये, यासाठी १६ ऑगष्ट रोजी शेतात इलेक्ट्रीक तारांद्वारे करंट सोडले होते. करंटमुळे एखाद्या मनुष्याचा जीव जाऊ शकतो, त्याची धर्मराज पाटील यांना जाणीव होती.
अशातच गावातील ३० वर्षीय योगेश शिवाजी गायकवाड हा रात्री या भागात गेला होता. त्याला शाॅक लागुन तो जागीच मरण पावला. १७ ऑगष्ट रोजी सकाळी आठ वाजता योगेश गायकवाड हा मृत झाल्याची वार्ता गावात पसरल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावचे पोलीस पाटील यांच्या खबरीनुसार मयत योगेश गायकवाड याचा मृतदेह पाचोऱ्यात आणला.त्याचे जळगाव येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले होते.

पोलीस विभागाचे ‘मौन’…?

पाचोराचे पोलीस निरीक्षक अशोक पवार हे पथकासह घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस पोलीस पाटील एकनाथ कोळी सोबत होते.पोलीस पाटील आणि पोलीस अधिकारी घटनास्थळाची पाहणी करत असतांना काही अज्ञात समुहाने दगडांचा वर्षाव केला. त्यात पोलीस पाटील आणि पोलीस पथकाच्या कर्मचारी वर्गाला दुखापत झाली. पोलीस गाडीच्या काचाही फुटल्या. यासंदर्भात दै. ‘साईमत’ने खासगीत काही पोलिसांना विचारणा केल्यावर गोलमाल उत्तरे देवून ‘मौन’ भूमिका वठवली. १८ ऑगष्ट रोजी दत्तु शिवाजी गायकवाड यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात धर्मराज श्रावण पाटील यांच्याविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस पाटील संघटना तक्रार करणार…!

खडकदेवळा येथील घटनेत गंभीर जखमी झालेल्या पोलीस पाटील एकनाथ कोळी यांच्यासह पोलीस प्रशासनावर दगडफेक करणाऱ्या ‘त्या’ अज्ञात समुहावर कार्यवाही करण्यात यावी. पोलीस पाटील यांंना सुरक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे. लवकरच संघटनेतर्फे उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांनी घटनेचा आढावा घेतला. तालुक्यातील खडकदेवळा येथे ‘राडा’ करणारा बाहेर गावातून आलेला तो समुह कोणता..? चिथावणी देणारे कोण…? पोलीस प्रशासनावर दगडफेक का झाली…? या घटनेचा तपास डीवायएसपी यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here