संभाजीनगरमध्ये ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ उद्घाटनप्रसंगी राडा; भाजपा अन्‌‍‍ एमआयएमचे कार्यकर्ते भिडले

0
10

संभाजीनगर : वृत्तसंस्था

जालना-मुंबई हाय स्पीड ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ उद्घाटन सोहळा वादाचा ठरला आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे एमआयएम आणि भाजपाचे कार्यकर्ते समोरा-समोर आलेले पाहायला मिळाले. खासदार इम्तियाज जलील यांचे संभाजीनगर स्टेशनमध्ये आगमन झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली तर, पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना रेल्वे स्टेशन बाहेर काढले.
जालना-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून तिचे उद्घाटन पार पडत असतांना उद्‌‍‍ घाटन पत्रिकेत नाव नसल्यामुळे नाराजी नाट्य समोर आले आहे.इम्तियाज जलील यांनी आमंत्रण न मिळाल्याने आणि पत्रिकेत नाव नसल्याने भाजपावर टीका केली.
त्यातच छत्रपती संभाजीनगर येथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे आगमन होणार होतं. त्यापूर्वी इम्तियाज जलील हे रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली तर, एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जलील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

“सगळ्यांची नावं
वगळण्यात आली आहे”
जलील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “लोकशाही मार्गाने माझा निषेध दर्शवण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणत्याही प्रकारचा कायदा आम्ही हातात घेतला नाही. भाजपाने हा रेल्वेचा कार्यक्रम न ठेवता पक्षाचा कार्यक्रम केला आहे. सगळ्यांची नावं वगळण्यात आली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त ‘मोदी-मोदी’ हेच काम यांना राहिले आहे. पोलिसांनी बळजबरीने माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले.”

भाजपाची मालमत्ता नाही
“माझ्या कार्यकर्त्यांनी मुंबईला जाताना रेल्वे थांबवली, तर याची जबाबदारी पोलिसांची असेल. आमच्या लोकांना बाहेर काढण्यात येत असेल, तर भाजपाच्या लोकांनाही बाहेर काढा. रेल्वे स्टेशन भाजपाची मालमत्ता नाही,” अशी टीका जलील यांनी केली
आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here