Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जळगावच्या आर. एल ज्वेलर्सची दुसऱ्या दिवशीही ईडीकडून चौकशी, गाडीतून नेली लोखंडी पेटी
    जळगाव

    जळगावच्या आर. एल ज्वेलर्सची दुसऱ्या दिवशीही ईडीकडून चौकशी, गाडीतून नेली लोखंडी पेटी

    SaimatBy SaimatAugust 18, 2023Updated:August 18, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    राज्यभरात ओळख असलेल्या राजमल लखीचंद ज्वेलर्सची सलग दुसऱ्या दिवशीही ईडीकडून तपासणी सुरू होती. स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत असलेल्या सहाशे कोटी रूपयांच्या कर्जा पोटी ईडी चौकशी करीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजेपर्यंत ईडी अधिकाऱ्यांनी ज्व्ोलर्समधील सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यांकन केले आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. त्यानंतर गाडीतून लोखंडी पेटी, पैसे मोजण्याचे मशिन आणि फाईली तपासणी अधिकाऱ्यांनी सोबत नेल्या.

    जळगाव शहरातील राजमल लखीचंद अर्थात आर एल समूहाच्या विविध आस्थापनांवर गुरुवारी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून एकाचव्ोळी सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यात जळगावमधील आर एल ज्व्ोलर्स, मानराज आणि नेक्सा शोरूमचा समाव्ोश आहे. यासाठी मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील साठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक आले आहे. या घटनेत माजी आमदार मनीष जैन यांचीही चौकशी केल्याचे बोलले जात आहे. आर, एलचे मालक माजी खासदार ईश्वर जैन हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांची चौकशी करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. राजमल लखीचंद ग्रुपतर्फे ईडी अधिकाऱ्यांना जी काही माहिती आवश्यक वाटत आहे, त्याबाबत पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे ईश्वरलाल जैन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

    दरम्यान, गुरुवारी सायंकाळपासून ईडी पथकाने चौकशी सुरू केल्यापासून राजमल लखीचंद ग्रुपमधील सर्वांचे मोबाईल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही सुरू असलेल्या तपासणीत ईडीच्या हाती काय लागले याची नेमकी माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, सहा महिन्यांपुर्वी देखील सीबीआयने चौकशी केली होती. त्याव्ोळी काय निष्पन्न झाले? याचीही माहिती समोर आली नाही. त्यानंतर आता या कारवाईमध्ये काही मिळते की केवळ चौकशीचा फार्स ठरतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    ईडी कारवाईमागे शरद पवार कनेक्शन?
    जळगावच्या राजमल लखीचंदवर ईडी कारवाई मागे राजकारण असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार ईश्वर बाबूजी जैन यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांना पािंठबा दर्शवला आहे. तर ईश्वर बाबूजी जैन यांचे चिरंजीव माजी विधानपरिषद आमदार मनीष जैन यांनी शरद पवार यांची साथ सोडून ते अजित पवार यांच्या पाठीशी उभी राहिले आहे. ईश्वर बाबूजी जैन हे दहा ते पंधरा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण राज्याचे खजिनदार होते. जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची जागा ही ईश्वर बापुजी जैन यांच्याच नावावर आहे. मात्र ही इमारत कर्जाच्या विळख्यात आहे. राज्याचे खजिनदार असल्या कारणाने त्यांच्याकडील महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती घेण्यासाठी तर ही कारवाई केली नसावी, अशा प्रकारच्या चर्चाना उधाण आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरी गावात किरकोळ वादातून तरुणावर जमावाचा हल्ला

    March 24, 2026

    Jalgaon : ‘पाच महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या’ – दीपक करंजीकर यांचा नवनिर्वाचित नगरसेवकांना सल्ला

    March 24, 2026

    Jalgaon:जळगावात केटरिंग व्यवसायावर गॅस सिलिंडरचा तुफान फटका

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.