चाळीसगावला मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकरांनी साधला संवाद

0
30

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

मराठा सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष युगपुरुष इंजि. पुरुषोत्तम खेडेकर आणि प्रा.अर्जुन तनपुरे यांनी चाळीसगाव येथे राज्यस्तरीय जनसंवाद दौऱ्यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, गणेश देशमुख, जळगाव, सुधीर पाटील, पी.एन.पाटील, प्रमोद पाटील, शेषराव पाटील, शिवाजीराव पाटील (मा. शिक्षणाधिकारी), दीपक पाटील, नगरसेवक, अनिल निकम, संजय पाटील, अविनाश देशमुख, प्रा.सुनील निकम, आर. बी. जगताप, जी.जी.वाघ आदी उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणीने आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा घेतला. तसेच संघटना वाढवा व तरुण पिढीला पुढे आणत संघ मजबूत करा. तसेच तालुकाध्यक्षांना सूचना करत महिला भगिनींना एकत्र आणून जिजाऊ ब्रिगेड संघटना लवकर स्थापित करा असा आदेश पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिला.

यांची होती उपस्थिती

दौऱ्याला चाळीसगावचे सर्व पदाधिकारी, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी वर्ग तसेच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ प्रमुख मार्गदर्शक यासोबतच किशोर पाटील, अजय देशमुख, राजेंद्र पगार, दीपक पाटील, सुनील चव्हाण, गोरख साळुंखे, एम.बी.पाटील, राकेश बोरसे, प्रदीप देसले, राकेश राखुंडे, तमाल देशमुख, नितीन पाटील, चेतन देशमुख, दीपक चव्हाण, अशोक भोसले, राकेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक समाधान पाटील, सूत्रसंचालन डॉ.रवी चव्हाण तर आभार कुणाल पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here