उपसभापतीपदी सूर्यकांत वाघ यांची बिनविरोध निवड
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा मजूर कामगार फेडरेशनच्या सभापती पदासाठी पुरुषोत्तम चौधरी तर उपसभापती पदासाठी सूर्यकांत वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीस सर्व संचालक मंडळाने एकमताने अनुमोदन देऊन सहमती दर्शवली. ही निवडणूक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
गेल्या वीस वर्षांपासून पुरुषोत्तम चौधरी हे फेडरेशनमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून संचालकांनी एकमुखाने त्यांच्यावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवली.निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक तथा अधिसी अधिकारी विशाल ठाकूर यांनी काम पाहिले. तसेच अजीत पाटील, जळगाव येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
नवीन सभापती व उपसभापती यांच्या बिनविरोध निवडीमुळे फेडरेशनमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भावी काळात संघटनेचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. निवड प्रक्रियेसाठी लिलाधर तायडे, प्रकाश पाटील,रोहिदास पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. निवडीसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
