Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्रीडा»Pre-Subroto Cup Women’s Football : प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत पंजाब संघ विजेता
    क्रीडा

    Pre-Subroto Cup Women’s Football : प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत पंजाब संघ विजेता

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJuly 12, 2025Updated:July 12, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रत्येकाने अंगी खेळाडूवृत्ती जोपासावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    उत्तम खेळीचे प्रदर्शन करत पंजाब संघाने कर्नाटक संघावर २-० ने विजय मिळवून सलग दुसऱ्यावर्षीही १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत विजयश्री खेचून आणली. उपविजेता संघानेही आपला सुयोग्य बचाव केला. त्यांना उपविजयी म्हणून समाधान मानावे लागले. खेळ आला तिथे पराभव आणि विजय तर होणारच. फुटबॉल हा असा खेळ आहे की, ज्याने सांघिक भावना व समन्वयाची वृद्धी होते. त्यासाठी खेळाडूंनी अंगी खेळाडूवृत्ती जोपासणे गरजे असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते विजयी उपविजयी संघाचा चषक, रोख पारितोषिकाचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

    यावेळी व्यासपीठावर सीआयएससीईचे अर्णवकुमार शॉ, सिद्धार्थ किर्लोस्कर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, मुख्य पंच ललिता सावंत, जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारूख शेख, जैन इरिगेशनचे अभंग जैन, जैन स्पोर्टस ॲकडमीचे अरविंद देशपांडे, प्रशिक्षक अब्दुल मोहसीन आदी मान्यवर उपस्थित होते.

    असा झाला अंतिम सामना

    प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेसाठी नऊ राज्यातून संघानी भाग घेतला होता. त्यात १४४ खेळाडूंनी १९ सामने खेळले. संपूर्ण सामन्यांमध्ये ७० गोल झाले. त्यातून आधी साखळी पद्धतीने नंतर बाद पद्धतीने अंतिम विजेता ठरला. कर्नाटक विरूद्ध बिहार व पंजाब विरूद्ध महाराष्ट्र यांच्यात सरळ लढत झाली. त्यातून अंतिम सामन्यासाठी कर्नाटक व पंजाब संघ समोर आले. संत बाबा हरिसिंग मॉर्डन स्कूल पंजाबच्या खेळाडूंनी ग्रीनवुड हायस्कूल (सर्जापूर, बेंगलुरू, कर्नाटक) यांच्यात पहिल्या अर्ध्या खेळापर्यंत चुरशीची लढत बघायला मिळाली. दोन्ही संघांकडून गोल करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू होते. परंतु खेळाच्या दुसऱ्या सत्रात पंजाबने कर्नाटकवर एक गोल करून विजयाकडे घौडदौड केली. पंजाबनेच अंतिम दुसरा गोल करून विजतेपद मिळविले. यानंतर पारितोषिक वितरण सोहळ्याच्यावेळी पंजाबी खेळाडूंनी विशेष नृत्य सादर करून आनंदोत्सव साजरा केला.

    विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान

    संपूर्ण स्पर्धेत बेस्ट गोलकिपर म्हणून महाराष्ट्राची फातेमा दलाल हिला सन्मानित केले. स्पर्धेत सर्वाधिक १० गोल पंजाबची जोया हसन हिने केले. त्यामुळे तिचा विशेष सन्माचिन्ह देऊन गौरव केला. विशेष म्हणजे अंतिम सामान्यातही ती ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरली. बेस्ट डिफेन्ससाठी पंजाबची खेळाडू सोनिया अटवाल हिचा सन्मान झाला. ग्रीनवुल्ड हायस्कूल कर्नाटकची खेळाडू अर्पिता तानिया हिचाही गौरव केला. यावेळी अर्णव शॉ यांनीही मनोगत व्यक्त करत अनुभूती स्कूलमधील उत्तम आयोजनाबाबत प्रशंसा केली. त्याचप्रमाणे बाबा हरीसंग मॉर्डन स्कूलच्या खेळाडूंचे कौतूक केले. तसेच निशा जैन यांनी अनुभूती स्कूलला यजमान पद मिळाल्याबद्दल सीआयसीएसईचे आभार मानले. पुढे क्रिकेट व तायक्वांदोमध्ये अशाच स्पर्धांचे नियोजन भविष्यात करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

    मुख्य पंच ललिता सावंत यांनी स्पर्धेतील बारकाव्यांसह वैशिष्ट्ये सांगितली. मान्यवरांचे स्वागत अशोक जैन, अतुल जैन यांनी केले. यशस्वीतेसाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., अनुभूती निवासी स्कूल, जैन स्पोर्टस ॲकडमीच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. पारितोषिक वितरण सोहळ्याचा समारोप राष्ट्रगीताने झाला. सूत्रसंचालन पलक संघवी तर प्राचार्य देबासिस दास यांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.