पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवारांकडून यांच्याकडे जाणार

0
23

पुणे : वृत्तसंस्था

सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे काही प्रमुख नेते मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चंद्रकांत पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याने पुण्याचे पालकमंत्रीपददेखील त्यांच्याकडेच जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फडणीस सरकारच्या आधीच्या पाच वर्षाच्या काळातील सुमारे चार वर्षे पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद होते. मात्र बापट खासदार झाल्यानंतर ही जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष पाटील पुण्यातून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले.

प्रदेशाध्यक्ष असले तरी आमदार या नात्याने पाटील जास्तीत जास्त काळ पुण्यात घालवत होते. त्यामुळे पुण्यातील राजकारणात पाटील यांचाच शब्द अंतीम मानला जाऊ लागला. राज्यात आता सत्तांतर होत आहे. त्यामुळे पुण्यातून मंत्री कोण होणार आणि पालकमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली. या चर्चेबाबत अधिकची माहिती जाणून घेतली असता पुण्याचे पालकमंत्रिपद पाटील यांच्याकडेच सोपवले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here