खा.ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते बळीराजाचे पूजन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील अभियंता भवनात बळीराजा स्मृतीदिनानिमित्त बळीराजाच्या प्रतिमेचे खा.ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात नुकतेच पूजन पार पडले. याप्रसंगी जळगाव जिल्हा शासकीय अभियंता पतपेढीचे संस्थापक चेअरमन तथा आजीव अध्यक्ष इंजि. साहेबराव पाटील, इंजि. प्रकाश पाटील, सुरेंद्र पाटील, इंजि. कमलाकर धांडे, हर्षल पाटील, रितेश निकम, सुरेश पाटील, शिवलाल बारी, भास्कर पाटील, इंजि. शेषराव पाटील, मालोजीराव पाटील, प्रमोद पाटील, मनोज पाटील, दीपक सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात खा.ॲड. उज्ज्वल निकम यांनी बळीराजाच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजा केली. त्यानंतर त्यांनी पतपेढीच्या वाचनालय व ग्रंथालयास भेट देत तेथील पुस्तक संपदेची माहिती घेतली. तसेच अभियंता भवनातील विविध दालनांना भेट देऊन अभियंता भवन हे एक उत्कृष्ट कलादालन असल्याचे गौरवोद्गार काढले. शेवटी सचिव राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.



