उपक्रमशील शिक्षक सतीश सूर्यवंशी लिखित ‘सेल्फी विथ सक्सेस’ पुस्तकाचे प्रकाशन

0
59

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय देणाऱ्या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक

 

तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथील वाडीलालभाऊ राठोड माध्यमिक आश्रमशाळेचे उपक्रमशील शिक्षक सतीश साहेबराव सूर्यवंशी लिखित व ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिकद्वारा प्रकाशित असलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला न्याय देणाऱ्या आगळ्या वेगळ्या माझी शाळा… माझा उपक्रमाद्वारे ‘सेल्फी विथ सक्सेस’ पुस्तकाचे प्रकाशन शेठ नारायण बंकट वाचनालयात नुकतेच करण्यात आले. पुस्तकांचे प्रकाशन न्या.संगीतराव पाटील, उपशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मछिंद्र राठोड, चिटणीस राजेश राठोड, सेवानिवृत्त ज्येष्ठ मुख्याध्यापक एम.डी. बागुल, प्राचार्य बी.पी. पाटील, प्राचार्य एस.एस. राठोड, मुख्याध्यापिका मीना बागुल, पर्यवेक्षक सी.डी. पाटील व लेखक सतीश सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. तथा नंदुरबार येथील सरदार सरोवर प्रकल्प प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या.संगीतराव पाटील होते.

यावेळी प्राचार्य बी.पी. पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम.डी. बागुल, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, उपशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, संस्थेचे चिटणीस राजेश राठोड यांनी मनोगत व्यक्त करुन सतीष सूर्यवंशी यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच ग्रंथमित्र अण्णा धुमाळ यांनी सतीश सूर्यवंशी आमचे जुने वाचक असून त्यांच्या वाचनाच्या व्यासंगामुळे त्यांना पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळली. अशा भव्यदिव्य ग्रंथालयात, ज्ञानभंडारात त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन होत असून ते कौतुकास्पद असल्याचे मनोगत व्यक्त केले.

यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रमाला सेवा सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक मंडळ, शाखेतील, इतर संस्थेतील आजी -माजी प्राचार्य, मुख्याध्यापक, ग.स.चे संचालक, शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद, समृद्धी शिक्षक फाउंडेशन, महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे तसेच सेवा निवृत्त प्राचार्य आर.बी. उगले, सी.डी. पाटील, राजेंद्र पाटील, दिनेश चव्हाण, रवींद्र चव्हाण, जामराव पाटील, चंद्रकांत ठाकरे, दिनेश मोरे, कामिनी पाटील, सुरेश चव्हाण, सुशांत जगताप, विशाल मोडके, पी.डी. सोनवणे, भूषण पाटील, संजय बहिरम आणि ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. के.व्ही. चव्हाण, प्रास्ताविक रवींद्र चव्हाण तर आभार प्रा.डी.डी. पवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here