उपस्थित मान्यवरांनी केले अंकाचे कौतुक
साईमत/चोपडा/प्रतिनिधी
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात वार्षिक नियतकालिक अंक संपादक मंडळातर्फे ‘शरभंग’ वार्षिक नियतकालिक अंकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी स्वरा प्रशांत अनवर्दकर, साक्षी रवींद्र पारधी, निकीता या विद्यार्थिनींनी गायलेल्या सुरेल स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील, माजी शिक्षणमंत्री कै.अक्कासो.सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी होते.
याप्रसंगी उद्घाटक व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, राम चंद्रशेखर मांडगे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य डॉ.ए.बी. सूर्यवंशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक ए.एन.बोरसे, समन्वयक पी.एस.पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या ‘शरभंग २०२३-२४’ वार्षिक नियतकालिकाच्या ५४ व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यांनी व्यक्त केले मनोगत
यावेळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे यांनीही उद्घाटनपर मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राम मांडगे यांनी ‘विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून अडचणींचा सामना करावा. ध्येय निश्चित करून त्या मार्गाने मार्गक्रमण करावे’, असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी समिती सदस्य डॉ.के.एस.भावसार, डॉ.ए.एच.साळुंखे, व्ही.डी. शिंदे, एन.बी.पाटील, डॉ.डी.डी.कर्दपवार आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक पी.एस.पाडवी यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय ‘शरभंग’ वार्षिक नियतकालिक अंकाचे संपादक डॉ.एम. एल.भुसारे यांनी करून दिला. सूत्रसंचलन व्ही.डी.शिंदे तर आभार एस.बी.देवरे यांनी मानले.