एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघाचे आ.अमोल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
साईमत /पारोळा/प्रतिनिधी –
‘
दै.साईमत’ने प्रकाशित केलेल्या ‘दिनदर्शिका २०२६’चे प्रकाशन मंगळवार दि.६ रोजी एरंडोल-पारोळा विधानसभा मतदार संघाचे आ.अमोल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना शहरप्रमुख आणि नगरसेवक अमृत चौधरी, नगरसेवक मनोज जगदाळे, विवेक पाटील, पंकज मराठे, दगडू पवार याशिवाय जळगांव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक सचिन पाटील तसेच ‘दै.साईमत’चे प्रतिनिधी प्रदीप पाटील आणि प्रभाकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात आ.अमोल पाटील यांच्याहस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करून झाली.
या उपक्रमाद्वारे ‘दै.साईमत’ने वाचकांसाठी सुलभ आणि माहितीपूर्ण दिनदर्शिकेची उपलब्धता सुनिश्चित केली आहे. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत ‘दै.साईमत’ परिवारास पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
