साईमत जळगाव प्रतिनिधी
कस्टर्ड महासंघाच्या सन 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. सदर कॅलेंडरचे प्रकाशन जळगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी खलील शेख , प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अधीक्षक विजय पवार , गटविकास अधिकारी जळगाव अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
दिनदर्शिकेचे जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये विनामूल्य वितरण दरवर्षीप्रमाणे मोफत करण्यात येणार आहे.
प्रसंगी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंखे ,कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सचिव ब्रह्मानंद तायडे, कोषाध्यक्ष प्रमोद लोंढे , , शिक्षक संघटनेचे सचिव राजू वानखेडे , तालुकाध्यक्ष नितीन सोनवणे , ज्येष्ठ सल्लागार गोपीचंद भालेराव , एस के कांबळे सर , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विभागीय सचिव योगेश भालेराव आदी उपस्थित होते.
