विवाहेच्छुक वधू-वरांनी अर्ज करण्याचे आयोजकांतर्फे आवाहन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय युवक मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय भव्य मेळावा रविवारी, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित केला आहे. यासाठी समाजातील सर्व इच्छुक वधू-वरांनी मेळाव्याचे अर्ज भरून लवकर लवकर पाठवावे, असे आवाहन युवक मंडळाने केले आहे. शहरातील एका हॉटेलात वधू-वर परिचय मेळाव्याच्या अर्जाचे प्रकाशन शांताराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी युवक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, उपाध्यक्ष सिताराम देवरे, सचिव अनिल पाटील, सहसचिव दशरथ चौधरी, सर्वश्री संतोष चौधरी, डॉ. मणिलाल चौधरी, अनिल चौधरी, विजय चौधरी, जे.व्ही. टेलर्स, नंदू चौधरी, विनोद चौधरी, प्रभाकर महाले, भगवान चौधरी, भगवान सोनवणे, दिलीप चौधरी, सचिन चौधरी, नामदेव चौधरी, अर्जुन चौधरी, किरण चौधरी, गुलाब चौधरी, सिंधूबाई चौधरी, डी.ओ. चौधरी, अनिल चौधरी, रामचंद्र चौधरी, शोभा चौधरी, निर्मला चौधरी, सुनील चौधरी, अशोक चौधरी (भुसावळ), प्रल्हाद चौधरी, जे.बी. चौधरी, विशाल पाटील, ॲड. भोलाणे, दिनेश चौधरी, योगराज चौधरी, दुर्गेश चौधरी, फकिरा चौधरी, सुभाष चौधरी, मेघश्याम चौधरी, आत्माराम चौधरी आदी उपस्थित होते.