Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Public Ganesh Mandals : सार्वजनिक गणेश मंडळांना मिळणार घरगुती दराने ‘वीजपुरवठा’
    जळगाव

    Public Ganesh Mandals : सार्वजनिक गणेश मंडळांना मिळणार घरगुती दराने ‘वीजपुरवठा’

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 19, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सुविधेचा मंडळांनी लाभ घेण्याचे वीज महावितरणतर्फे आवाहन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

    सार्वजनिक गणेश मंडळांना वीज महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीज जोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. या सुविधेचा सार्वजनिक गणेश मंडळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

    गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था मंडप परवानगी, पोलीस स्थानक परवाना, विद्युत निरीक्षकांचे वीज संच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी, चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.

    गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये, यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे आदी यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून करून घेण्यात यावी. गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. आपात्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. याबरोबरच महावितरणच्या स्थानिक नियंत्रण कक्षांचे ७७९८१२०१५५ (जळगाव मंडल), ७८७५७६६७६३ (धुळे मंडल), ७८७५५५४५४३ (नंदुरबार मंडल) हे क्रमांक तसेच १९१२, १८००-२१२-३४३५ व १८००-२३३-३४३५ टोल फ्री क्रमांक ग्राहकांच्या सेवेत २४ तास उपलब्ध असल्याची माहिती मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी दिली.

    अनामत रक्कम मिळणार विनाविलंब परत

    तात्पुरत्या वीज जोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यावर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरावी, असे आवाहनही महावितरणने केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव जिल्ह्यात एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वेक्षण समन्वय बैठक संपन्न

    December 31, 2025

    Jamner:नाचनखेडा येथे पशुपालकांनी ‘चारा लावा, पशुधन वाढवा’ कार्यक्रम उत्साहात

    December 31, 2025

    Bhadgaon:रणा नदीतून वाळू चोरी रोखताना महसूल-पोलिसांवर हल्ला

    December 31, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.