जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले स्वागत
साईमत/पारोळा/प्रतिनिधी :
तालुक्यातील रताळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) युवा जिल्हा चिटणीस उद्धव धुडकु पाटील, संजय बुधा पाटील, अनिल महादु पाटील, सचिन तुळशीराम वाघ, प्रल्हाद उखा पाटील, शांताराम बारकु पाटील, सतिष रघुनाथ गढरी, हिरामण बारकु पाटील, हरचंद धुडकु पाटील, सुकलाल फुलसिंग भिल, राकेश हसरत पाटील, शामराव बापु भिल, आबा संजय भील, अनिल विनायक भिल, दादाभाऊ युवराज पाटील, वाल्मिक एकनाथ पाटील, प्रवीण सुकलाल भील, समाधान वाल्मिक पाटील यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी आ.चिमणराव पाटील व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि गावांचा होत असलेला झपाट्याने विकासाला प्रेरित होवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी ग्रामस्थांचे अमोल पाटील यांनी शिवसेनेत स्वागत केले.
तसेच आपल्या गावातील लोकाभिमुख व गावाचा वैभवात भर घालणाऱ्या विकासकामांना आ.चिमणराव पाटील यांच्या माध्यमाने प्राधान्याने मंजूर करून आपल्या समस्यांची दखल घेणार आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव आपल्या सोबत असल्याचे अमोल पाटील यांनी आश्वासित केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी पारोळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दयाराम पाटील, शेतकी संघाचे संचालक भैय्यासाहेब पाटील, भैय्यासाहेब पाटील, साहेबराव पाटील, करमाड येथील गुलाब पाटील, सरपंच शरद पवार, गोपाल पाटील, प्रदीप पाटील, गणेश पाटील, दिलीप पाटील, सुभाष वंजारी, रोहीत पाटील, जयेश पाटील, हर्षल पाटील, रताळे येथील संदीप गढरी, लक्ष्मण पाटील, हेमराज पाटील, विक्रम गढरी, हिम्मत पाटील, सुनिल पाटील, नंदु चव्हाण, नागो चव्हाण, सुधाकर पाटील, आबा पाटील, शांताराम पाटील, शांताराम पाटील, ऋषिकेश गढरी, शिवरे येथील पोलीस पाटील तुकाराम पाटील, श्याम पाटील, मेहु पोलीस पाटील अनिल पाटील, पारोळा येथील कैलास पाटील, कोमल पाटील, मयूर भोई यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.