बोदवड : प्रतिनिधी
येथील विधीसेवा प्राधिकरण आणि बोदवड पो.स्टे. यांच्या संयुक्त विद्यमाने बोदवड पो.स्टे. येथे रस्ते सुरक्षा, वाहन कायद्याबाबत जनजागृतीबाबत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील यांनी वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी तथा उद्घाटक न्या.क्यु.यु.एन शरवरी होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
वाढत अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू पाहता काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने वाहतूक नियम मोडणाऱ्या शिक्षेच्या आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. मात्र, त्यानंतरही वाहन चालक हे नियम पाळत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बोदवड तालुका विधी सेवा प्राधिकरण व बोदवड न्यायालय, बोदवड पोलीस प्रशासनामार्फत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वाहतूक नियमांचे रिक्षा व वाहन चालक यांना ॲड. अर्जुन पाटील, उपाध्यक्ष ॲड. धनराज सी. प्रजापती, ॲड.आय.डी पाटील, ॲड.के.एस इंगळे यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला पो.नि.राजेंद्र गुंजाळ, नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक गोलु बरडीया, हर्षल बडगुजर, जिया शेख, अविनाश पोफळे, फोटोग्राफर निशांत पवार, सहकारी राहुल सपकाळे, रूपेश माळी, पोलीस कर्मचारी वर्ग, रिक्षा चालक व वाहन चालक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी केस वॉच राजेंद्र महाजन, पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार शैलेश पडसे यांनी मानले.