वरणगावात रस्त्यांच्या कामांसाठी उद्या आंदोलन

0
33

साईमत/ न्यूज नेटवर्क/वरणगाव :

शहरातील रेल्वे स्थानक ते बसस्थानक चौकातील तिरंगा सर्कलपर्यंत सिमेंट कॉक्रीटीकरणाने रस्ता दुहेरी करण्याचे काम सुरू आहे . मात्र, होत असलेल्या रस्त्यात अधिकारी दुजाभाव करीत असुन रेल्वे स्थानक भागात १८ मिटर तर बस स्थानक भागाकडे केवळ १५ मिटर रुंदीकरणाचे काम केले जात आहे . त्यामुळे सा.बां. विभागाने रस्त्याचे काम नियमानुसार करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष सुनील काळे व पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. मात्र, अद्यापही त्याची दखल घेतली जात नसल्याने हा मार्ग रुंदीकरण करण्यात येवून त्यामध्ये दुभाजकांचे काम करण्यात यावे, यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी तसेच शहरातील काही नागरिक बुधवारी, ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वरणगाव बसस्थानकातील तिरंगा सर्कल येथे आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

यामुळे प्रलंबित ठेवण्यात आलेल्या मार्गाचे काम त्वरीत मार्गी लागल्यास या भागातून मार्गक्रमण करणारे रहिवाशी, प्रवासी, वाहन धारक व शालेय विद्यार्थ्यांना सोयीचे ठरणार आहे . तसेच दुभाजकामुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडणार असल्याने आंदोलनात शहरातील जास्तीत – जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here