‘Sanatan’ Organization In Jalgaon : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुध्द जळगावात ‘सनातन’ संस्थेचे निषेध आंदोलन

0
17
(c)Kaushik K Shil +919903371497

हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू समाज, सनातन धर्म आणि सनातन संस्था यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्याच विधानाचा निषेध करण्यासाठी गुरूवारी, २१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘सनातन’ संस्थेने जोरदार आंदोलन केले. यावेळी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या विधानाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.

निषेध आंदोलनात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा निषेध करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनानंतर संस्थेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनात हिंदू धर्म आणि संस्थांबद्दल अशा प्रकारची विधाने करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

‘सनातन’ संस्थेने आरोप केला आहे की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सत्तेवर असलेल्या आणि जबाबदार पदावर काम केलेल्या व्यक्तीने अशा प्रकारची विधाने करणे योग्य नाही, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘सनातन’ संस्थेने केलेल्या आंदोलनामुळे हा मुद्दा अधिकच गंभीर बनला आहे.

यांचा होता आंदोलनात सहभाग

आंदोलनात सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, योग वेदांत सेवा समिती, रणरागिणी समिती, राष्ट्र भक्त अधिवक्ता समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु राष्ट्र समन्वय समिती, स्वामीनारायण संप्रदाय, वारकरी संप्रदाय, वीर बाजीप्रभु गणेश मंडळ, श्री महाबली ढोल पथक, हिंदू महासभा, अधिवक्ता संघ, सकल हिंदू समाज आदी अनेक हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय यांचे २०० हून अधिक साधक धर्मप्रेमी बांधव सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here