साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्थेला हरताळ फासणाऱ्या राहुल नार्वेकर यांच्या विरोधात शिवसेना उबाठाच्या मलकापूर शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी राहुल नार्वेकर यांच्या फोटोला काळे फासले. त्यांच्या तोंडावर जोडे मारुन काळे झेंडे दाखवत तोंडावर काळी पट्टी बांधून जाहीर निषेध व्यक्त केला.
विधानभवनात झालेल्या अंतिम सुनावणीत पात्रतेच्या लढाईमध्ये हेतू पुरस्कर सुप्रीम कोर्टाने निरीक्षणे नोंदवून अपात्रतेच्या निकालासाठी जी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली होती. त्यास हरताळ फासून, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा विश्वासघात करून यांच्या पाठीत खंजिर खुपसला. लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवून खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करणाऱ्या, नार्वेकर यांचा तहसील चौकात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून व तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून निषेधाचे बॅनर झळकावून जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी शिवसेना विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील, शिवसेना उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, कामगार सेना तालुकाप्रमुख राम थोरबोले, माजी नगरसेवक पांडुरंग चिम, युवासेना शहरप्रमुख पवन गरुड, युवा सेना उपशहरप्रमुख चॉद चव्हाण, कामगार सेना शहरप्रमुख हरिदास गणबास, रामराव तळेकर, दीपक कोथळकर, हसन गौरी, जावेद खान, अतुल गोसावी, नंदु मावळे यांच्यासह उबाठाचे शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.