एमआयडीसीतील कंपन्यातून सुमारे 700 किलो वजनाच्या प्रतिबंधात्मक प्लास्टीक जप्त

0
25

जळगाव ः साईमत लाईव्ह प्रतिनिधी

एमआयडीसीतील अग्रवाल पॉलिटेक व एसएस प्लास्टो या कंपन्यामधून प्रतिबधित 51 मेक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. एमआयडीसीतील एस 11 मधील धिरज अग्रवाल यांची अग्रवाल पॉलिटेक या चटई बनविणाऱ्या कंपनीत 51 मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या तयार होत असल्याची माहिती मनपाच्या पथकाला मिळाली होती.

या माहितीवरुन मनपा पथकाने कंपनीची तपासणी केली असता. कंपनीत साधारणत 200 किलो वजनाची पिशव्या आढळून आल्या त्यामुळे त्यंच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच एमआयडीसीतील के-12 सेक्टरमधील यु.बी.बऱ्हाटे यांची मे.एस.एस.प्लास्टो या कंपनीत तपासणी केली असता. 51 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या जवळपास 500 किलो वजनाच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. या वरुन सदर कंपनीकडून पाच हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. सदरच्या कारवाईत आयुक्त डॉ.विद्या गायकवाड व सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टीक बंदी पथकाचे प्रमुख जितेंद्र किरंगे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख संजय ठाकूर, आरोग्य युनिटचे प्रमुख रमेश कांबळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे मुकादम व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here