मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळाल्याबद्दल समाज चिंतामणीतर्फे रविवारी कार्यक्रम

0
11

साहित्यिक, रसिकांसह भाषाप्रेमींना उपस्थितीचे आवाहन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी रविवारी, ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता काव्यरत्नावली चौकात समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. साहित्यिक, रसिक व भाषाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत भंडारी, भगवान भटकर, भास्करराव चव्हाण, डी. बी. महाजन, निवृत्तीनाथ कोळी, गोविंद पाटील, अशोक पारधे, वर्षा अहिरराव, ज्योती राणे, आर. जे. सुरवाडे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here