चाळीसगाव महाविद्यालयात ‘महिलांचे मानसिक आरोग्य’वर कार्यक्रम

0
60

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा अंतर्गत ‘महिलांचे मानसिक आरोग्य’ विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता. युवती सभेत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे डॉ.पायल पवार यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून महिलांनी आपले विचार, भावना, वागणूक यांची सांगड घातली पाहिजे. तसेच आपले शारीरिक व मानसिक आरोग्य कसे जपावे याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच प्रश्‍नोत्तरामार्फत विद्यार्थिनींच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अजय काटे यांनी सध्याच्या धावत्या युगात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यही जपले पाहिजे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डी.एल.वसईकर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.पी.व्ही.पगार, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एम.एस.पाटील उपस्थित होते. प्रास्ताविकात युवती सभेच्या प्रमुख प्रा.डॉ.नयना पाटील यांनी विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कोणकोणते कार्यक्रम घेतात, त्याची सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय तथा सूत्रसंचालन प्रा. डॉ. पूनम निकम तर आभार प्रा.डॉ. दीपाली बनस्वाल यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here