साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर
येथील माहेश्वरी महिला मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. असाच एक अनोखा उपक्रम माहेश्वरी महिला मंडळातर्फे जि. प. शाळा कासोदा येथे नवरात्रीनिमित्त कुमारिका(कन्या) पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी कासोदा माहेश्वरी समाजाच्या अध्यक्षा साधना मंत्री, जळगाव जिल्हा माहेश्वरी समाजाच्या उपाध्यक्षा सरिता मंत्री उपस्थित होत्या. सुरुवातीला सर्व मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा करण्यात आली. त्यांना हळदी कुंकू देण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य तसेच विविध भेटवस्तू देण्यात आल्या.
तसेच भविष्यातही असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देण्यात आली. प्रत्येकवेळी माहेश्वरी मंडळ मुलींना सहकार्य करतील, असेही सांगितले.
कार्यक्रमाला माहेश्वरी मंडळाच्या सदस्या शारदा बियाणी, तारा समदानी, विद्या समदानी, मनीषा सोमानी, किरण मंत्री, चंदा पांडे, पुष्पा समदानी, विद्या समदानी, लता सोमानी, कमलाताई, रोहिणी मंत्री, शांती बियाणी, लक्ष्मी पांडे, कोमल मंत्री उपस्थित होत्या. प्रास्ताविक जि.प.कन्या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र मोरे यांनी केले. कार्यक्रमासाठी दीपक पाटील यांचे सहकार्य लाभले.