शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्याचा मान्यवरांनी केला गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथे अठरावे बहिणाबाई-सोपानदेव खान्देश साहित्य संमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. संमेलनात जळगाव येथील केसीई सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील (मु.जे.महाविद्यालय) येथे कार्यरत कवयित्री तथा प्रा.संध्या महाजन यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संमेलनाध्यक्ष साहित्यिक प्रा.डॉ.फुला बागुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्याचा गौरव करत खा.स्मिताताई वाघ यांच्या हस्तेही विशेष सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
संमेलनाला आ.राजूमामा भोळे, खा.स्मिताताई वाघ, विष्णू भंगाळे, स्वागताध्यक्ष पुष्पा साळवे, साहित्यिक बी.एन.चौधरी, डॉ.संजीवकुमार सोनवणे, अरविंद नारखेडे, सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड, आयोजक विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे, डॉ.अशोक पारधे, संमेलन कार्याध्यक्ष विजय लुल्हे, तुषार वाघुडदे आदी उपस्थित होते.
