इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. ए. एल. चौधरी

0
20

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी यांची ‘इलेक्ट्रॉनिक्स व इन्स्ट्रुमेंटेशन’ विषयाच्या अभ्यास मंडळावर अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल.चौधरी, एन. एस. कोल्हे, एस. पी. पाटील, समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, समन्वयक पी. एस. पाडवी, डॉ. पी. एम. रावतोळे, संदीप बी.पाटील आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. ए. एल.चौधरी यांनी सिंगापूर व जपान येथे अभ्यास दौरे केला आहे. त्यांना युजीसीतर्फे चार फेलोशिप प्राप्त झाल्या आहेत.त्यांना कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे बेस्ट टीचर अवार्ड तसेच महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार, नॅशनल बिल्डर्स अवार्ड व समाजरत्न पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स व संशोधन विषयक संस्थांचे फेलो सदस्य व आजीवन सदस्य म्हणून काम पाहिले आहे. ६० हून अधिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विद्यापीठस्तरीय कार्यशाळा, परिषदा व चर्चासत्रात सहभाग नोंदविला आहे. १८ कार्यशाळा, चर्चासत्र व सेमिनारचे त्यांनी आयोजन केले आहे. एक मायनर व एक मेजर प्रोजेक्ट पूर्ण केला आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत एक विद्यार्थी एम.फिल आणि एक विद्यार्थ्याने पीएचडी प्राप्त केली आहे. तसेच सध्या दोन विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करीत आहेत. त्यांचे आत्तापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ४७ हून अधिक संशोधन लेख प्रकाशित झाले आहे. ४० हून अधिक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. २७ हून अधिक ठिकाणी त्यांनी अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य एन. एस. कोल्हे, प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, समन्वयक डॉ. शैलेश वाघ यांच्यासह इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here