साईमत जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रज्ञान प्रशाळेत नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात प्रा.डॉ.जी.ए.उस्मानी यांना “लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड” देण्यात आला. प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.जे.बी.नाईक, सुहान्स केमिकल्स जळगावचे संचालक, उद्योजक संदीप काबरा व रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गनी मेमन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेली ३० वर्षे अध्यापन, विद्यापीठात वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाची संकल्पना रुजवणे, विद्यापीठाचे विविध स्तरावर त्यांनी केलेले प्रतिनिधित्व, विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचलन, कवी, लेखन, उद्बोधक अशा अनेक गोष्टींमध्ये आपला ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.