स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण उत्साहात

0
14

साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रमांतर्गत तहसिल कार्यालय भुसावळआयोजित तालुकास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण, सन्मान सोहळा व सांगता आज सकाळी आय.एम ए. हॉल येथे उत्साहात पार पडला.
या वेळी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धिवरे, नायब तहसीलदार एस. आर. घुले , प.स. विस्तार अधिकारी तुषार प्रधान , नायब तहसीलदार अंगत आसटकर , के नारखेडे विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. डी. किरंगे आदींची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक निवासी नायब तहसीलदार श्रीमती घुले यांनी केले.
या स्पर्धेचे संयोजकांना , विविध स्पर्धा प्रमुखांना, परीक्षक यांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. वक्तृत्व, रांगोळी,निबंध ,पत्रलेखन,गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
प्रथम , द्वितीय , तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस वितरण निबंध स्पर्धा ,वक्तृत्व , पत्रलेखन , गीत गायन व चित्रकला स्पर्धा विजेत्यांना वितरित करण्यात आले .
गट 1 ई पहिली ते चौथी, गट 2 पाचवी ते सातवी, गट 3 ई 8 वी ते 12 वी या गटात स्पर्धा घेण्यात आली. गीत गायन व चित्रकला स्पर्धा फक्त एकाच गटात घेण्यात आली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे 11 वाजेला सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here