वाघळुद शाळेतील स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांकडून कलागुणांचे सादरीकरण

0
11

साईमत, यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील वाघळुद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रंगतरंग वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण केल्याने पालक वर्गांमध्ये कौतुक करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी भर द्यावा, अशा प्रकारची माहिती उपस्थितांनी दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटन यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक चौधरी, शेतकी संघाचे व्हा. चेअरमन तेजस धनंजय पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय बोरोले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद सपकाळे, ग.स.सोसायटीचे संचालक योगेश इंगळे, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रदीप सोनवणे, कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान जाधव, संजय ताडेकर, कमलेश नेहेते यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते थोर पुरुषांचे व रंगदेवतेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक अमित पाटील यांनी शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा सादर केला. तसेच शाळेत सुरू असलेल्या विविध नवीन उपक्रमाची माहिती पालकांना दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी एकांकिका, सामूहिक नृत्य, वैयक्तिक नृत्य आणि समाजासाठी उपदेश असणारी नाटिका सादर करून श्रोत्यांची मने जिंकून घेतली. आदर्श विद्यार्थी म्हणून ओम सुरेश पाटील, रिद्धीशा धनराज सनेर यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजय पाटील, उपाध्यक्ष ज्योती पाटील, तज्ज्ञ संचालक तथा शिक्षण प्रेमी निखिल सपकाळे, राजू पाटील, रूपेश पाटील, हर्षवर्धन मोरे यांच्यासह सर्व युवक मंडळ, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या निमंत्रित सत्कारार्थी यांचा शाळेतर्फे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यात डॉ.जगदीश पाटील, कल्पना माळी, प्रसन्ना बोरोले, संतोष मराठे, अमित चौधरी, शैलेंद्र महाजन, अतुल चौधरी यांचा समावेश होता. सुत्रसंचालन राहुल भारंबे तर आभार दीपक वारके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here