केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

0
16

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

येथील निवृत्ती नगरमधील केरळी महिला ट्रस्टचे अयप्पा स्वामी मंदिर रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी खुले करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरपासून कार्तिका पौर्णिमा उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

संपूर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदिर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमीत्त दर्शनासाठी खुले करण्यात येते. या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांची देखिल मंदीर आहे. ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी भाविक दुरदेशातून मोठ्या प्रमाणात येत असतात. अभिषेक व पूजेसाठी गुरूजीसह स्वतंत्र व्यवस्था केली आहे. येत्या २६ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या कार्तिकी पौर्णिमा उत्सवाची तयारीला सुरूवात करण्यात आली. कार्तिक नक्षत्र ११वा.१० सकाळी सुरू होत असून दु. ३ वा.५३ मि. कार्तिक पौर्णिमा सुरू होत आहे. २७ नोव्हेंबर रोजी दु. २ वा.१५ मि. समाप्ती होणार आहे. दर्शनासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मंदिर खुले करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी दर्शन घ्यावे, असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे केले आहे. अधिक माहितीसाठी केरळी महिला ट्रस्ट संस्थापक-अध्यक्ष श्रीमती अयर यांच्याशी ९४०५१४३२३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here