निंभोरा गावात प्रहार पक्षाच्या परिवर्तन यात्रेचे स्वागत

0
51

अनिल चौधरी यांच्यामार्फत शिबिरात शासनाच्या विविध योजनांची माहिती

साईमत/निंभोरा बु., ता.रावेर/प्रतिनिधी :

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पार्टीची परिवर्तन यात्रा अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निंभोरा गावात येऊन पोहचली.यात्रेचे निंभोरा ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन गरजुंना योजनांचा फायदा कसा घेता येईल याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. कामगार मजुरांना, महिलांना भाड्यांचा संचाचे वाटप करण्यात आले.

यावेळी हर्षदा चौधरी यांनी महिलांना रोजगार, बचत गट यांची सविस्तर माहिती दिली. शिबिर घेण्याविषयी मार्गदर्शन केले. परिवर्तन यात्रेस लोकांचे अतुट प्रेम आणि पाठिंबा विशेष म्हणजे महिलांचा पाठिंबा जास्त प्रमाणात जाणवला. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, माताभगिनींचे बळ, प्रोत्साहन व त्यांचे प्रेम हे यात्रेला चालना देते. त्यांच्या आशा व स्वप्ने या परिवर्तन यात्रेस मार्ग दाखवितात. रावेर-यावल मतदार संघातील जनतेशी जुळलेली नाळ अधिक घट्ट करण्यासाठी निंभोरा गावात जनतेशी संवाद साधला.

बांधकाम कामगार, मजुरांसाठी असलेल्या योजनेची जास्तीत जास्त नोंदणी करून प्रत्येकाला भांडे आणि साहित्याचे किट वितरीत केले. जनसेवेचा वसा पुढे चालत राहणार आहे. आम्ही जनतेचे सेवेकरीच राहणार असल्याचे अनिल चौधरी यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

प्रहार जनशक्ती पार्टीचे रावेरचे तालुकाध्यक्ष भरत लिधुरे, मनोज सोनार, रावेरचे मा.पं.स.स. प्रमोद कोंडे, रमेश येवले, प्रभाकर सोनवणे, नितीन पाटील, शोऐब खान, राजेंद्र महाले, गणेश तेली, रोहीदास तायडे, राहुल चौधरी, अमोल गिरडे, कृष्णा खाचणे, प्रशांत सोनवणे, तेजस कोळी, शाहरुख खाटीक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here