साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील बी. पी.आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालय तसेच के.आर.कोतकर ज्युनिअर महाविद्यालयात सोमवारी, २२ जानेवारी रोजी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्यावतीने श्रीराम लल्ला प्रतिष्ठापनादिनानिमित्त प्रभू श्रीरामाच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. व्ही.बिल्दीकर, उपप्राचार्य डी.एल.वसईकर, डॉ. के. एस. खापर्डे आणि उत्सव समितीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करून प्रतिमा पूजन तसेच दीप प्रज्ज्वलन करण्यात आले.
यानंतर सर्व उपस्थितांनी १०८ वेळा राम रक्षा स्तोत्राचे पठण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डी.एल. वसईकर यांनी रामरक्षा पठणाचे पौराहित्य केले. तसेच यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.बिल्दीकर यांनी मनोगतात मर्यादा पुरुषोत्तमाची माहिती सांगून संस्कार आणि मर्यादा यामध्ये मानवाने आपले आचरण शुद्ध ठेवले पाहिजे, असे सांगितले. यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे सर्व सदस्य प्रा. अंकुश जाधव, प्रा. आर. एस. पाटील, डॉ.एस. वाय. पवार, प्रा. वैशाली पाटील, प्रा.भाग्यश्री विसपुते, प्रा.प्रमोद पवार यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन प्रा.रवि पाटील यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार मानून प्रसादाचे वाटप करण्यात आले.