साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त धुळे येथे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा पवार यांना जगन्नाथ ताकते यांच्या हस्ते ‘मराठा गुणगौरव पुरस्कार’ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. त्या समाजात मोठ्याप्रमाणे काम करतात. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना गौरविण्यात आले. त्या सर्व महिलांच्या अडीअडचणींना दाद देऊन महिलांचे प्रश्न सोडवित असतात. म्हणून त्यांना ‘मराठा गुणगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
