प्रताप विद्या मंदिराची विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यशोपताका फडकवली

0
66

रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, वाचनीय पुस्तके देऊन स्पर्धकांचा गौरव

साईमत/चोपडा/प्रतिनिधी :

येथील प्रताप विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय वकृत्त्व, गीत गायन, व निबंध स्पर्धा भुसावळ येथील के.नारखेडे विद्यालयात स्व. बाबासाहेब के नारखेडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात चोपडा येथील प्रताप विद्या मंदिराची विजयी पताका सदैव फडकवित विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत विद्यालयाचे उपशिक्षक पंकज शिंदे यांनी राज्यस्तरावर दुसरा क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पी.एस. ठाकरे, एम.एफ. माळी, पी.बी.कोळी या मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे विज्ञान विभाग प्रमुख डॉ.दिलीप देशमुख यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व वाचनीय पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शैला मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन राजा मयूर, सचिव माधुरी मयूर, कार्यकारिणी सदस्य चंद्रहास गुजराथी, भूपेंद्र गुजराथी तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी.एस.गुजराथी, उपमुख्याध्यापक पी.डी.पाटील, पर्यवेक्षक एस.एस.पाटील, एम.डब्ल्यू.पाटील, ए.एन.भट, उपप्राचार्य जे.एस.शेलार, समन्वयक गोविंद गुजराथी, उल्हास गुजराथी, डी.टी.महाजन तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

स्पर्धेतील विजेते स्पर्धक असे :

गट क्रमांक १ वकृत्त्व स्पर्धा – राज्यस्तरीय प्रथम क्रमांक अविका कमलेश गायकवाड, राज्यस्तरीय तृतीय क्रमांक स्वरा महेंद्र पाटील. गट क्र. २ वकृत्त्व स्पर्धा – राज्यस्तरीय तृतीय क्रमांक कैस खान रजा खान. गट क्रमांक ३ वकृत्त्व स्पर्धा – राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मुग्धा विजय याज्ञिक. गट क्रमांक ४ वकृत्त्व स्पर्धा- राज्यस्तरीय प्रथम क्रमांक रोशनी देविदास पाटील. उत्स्फूर्त वकृत्त्व स्पर्धेत – राज्यस्तरीय प्रथम वेदिका सुनिल साळुंखे. सुगम संगीत गायन- राज्यस्तर तृतीय घनश्याम रवींद्र कोळी. राज्यस्तर निबंध स्पर्धा – राज्यस्तरीय प्रथम क्रमांक स्पर्श डिगबंर पाटील. गट क्रमांक ४ – राज्यस्तर तृतीय क्रमांक भूमिका नंदलाल तांबट. शिक्षकांसाठी आयोजित राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा गट – राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक पंकज शिंदे. वकृत्व स्पर्धेत सृष्टी नरेंद्र महाजन व गीत गायन स्पर्धेत गायत्री रवींद्र कोळी यांनीही यशस्वी सहभाग नोंदवला. विजेत्यांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here