साईमत, जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कुल विद्यालयात मुख्याध्यापक संघाची नुकतीच सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष तथा हिवरखेडा हायस्कुलचे मुख्याध्यापक गोपाळ पाटील होते. सभेला मुक्ताईनगर सुकळी हायस्कुलचे मुख्याध्यापक तथा निवडणूक निरीक्षक पी.पी.दाणे, श्री.काटे उपस्थित होते. यावेळी शेंदुर्णी येथील स्व.शेठ राजमल लखीचंद ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक तथा जामनेर तालुका उच्च माध्यमिक तालुका समन्वयक प्रमोद खलसे यांची जामनेर तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सभेला आर.ए.पाटील नेरी, व्ही.एस.पाटील सामरोद, ए.ए.पाटील कापूसवाडी, गोपाल गुरुभाई वाघारी, गणेश पाटील टाकळी, आर.जे.सोनवणे, जामनेर, किशोर ढेकाळे नांद्रा, एस.आर.चौधरी वाकोद, श्री.निकम पळासखेडा मिराचे, श्री.बोरसे शहापूर, मनोहर पाटील तोरणाळे यांच्यासह तालुक्याभरातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यावर निवडणूक निरीक्षक श्री.दाणे यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. तसेच जामनेर तालुका गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार, माजी सहकारी शिक्षक विस्तार अधिकारी तथा जळगावचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विजय सरोदे, शालेय पोषण आहार अधीक्षक व्ही.व्ही.काळे यांच्यासह सर्व उपस्थित मुख्याध्यापक यांनीही कौतुक केले.
त्यांच्या निवडीबद्दल मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.के.पाटील, संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खा.ईश्वरबाबूजी जैन, सचिव माजी आमदार मनीष जैन, संस्थेचे समन्वयक प्रा.अतुल साबद्रा, विद्यालयातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच तालुकाभरातील विविध शिक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.