नगावची प्राची गिरी शुक्रवारी ‘एबीपी माझा’ लाईव्हवर झळकणार

0
39

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील नगाव येथील सुयोग शिक्षण मंडळाने चालविलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगाव-गडखांब विद्यालयाची ६ वीची विद्यार्थिनी प्राची भूषण गिरी हिची ‘एबीपी माझा’ लाईव्हवर शुक्रवारी, ११ ऑगस्ट रोजी ११ वाजता प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबई येथे निवड झालेली आहे.

ज्ञान की चळवळ, पुणे व ‘एबीपी माझा’ लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सव स्वतंत्र भारत अभिनव पोस्ट कार्ड स्पर्धेत प्राचीची निवड झालेली आहे. तिच्यासोबत समन्वयक शिक्षक प्रा.कैलास सोनवणे यांची निवड झालेली आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, प्रदीप लोखंडे आदी उपस्थित राहणार आहेत.

या निवडीबद्दल प्राचीचे जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ.एन.आर.पाटील, प्राचार्य दादासाहेब तुषार बोरसे यांच्यासह विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here