साईमत, जळगाव ः प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “मेरी मिट्टी मेरा देश ” या अभियाना अंतर्गत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि. ११ रोजी सकाळी ८ वाजता” प्रभात फेरी व वृक्षिंदडी काढण्यात आली. महापालिका प्रशासकीय इमारती पासून पंडित जवाहरलाल नेहरू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते चित्रा टॉकीज चौक ते लालबहादूर शास्त्री टावर चौक ते मनपा प्रशासकीय इमारत या मार्गाने रॅली आयोजित करण्यात आली होती.
याव्ोळी महापौर जयश्रीताई महाजन यांनी प्रभात फेरी व वृक्षिंदडी रॅलीला आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचे उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रभात फेरी व वृक्षिंदडीत उपायुक्तअविनाश गांगोडे , सहा आयुक्त गणेश चाटे , सहा आयुक्त अभिजीत बाविस्कर, मुलेप, सहा आयुक्त अश्विनी गायकवाड, नगरसेविका उज्वला बेंडाळे, माजी. सभापती राजेंद्र (घुगे )पाटील, विशाल त्रिपाठी, प्र.सहा.आयुक्त उदय पाटील (आरोग्य), प्रशासन अधिकारी (शिक्षण) दिपाली पाटील,शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, उप अभियंता संजय नेमाडे, नगरसचिव सुनील गोराणे तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख तसेच सर्व विभागातील कर्मचारी वर्ग, महापालिकेच्या इयत्ता ८ वी ते १० वी मधील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.