साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
‘न भूतो न भविष्यती’ असा शेकडो कोटींचा निधी आणून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी दिवस रात्र एक करत असताना आ.मंगेश चव्हाण यांनी प्रशासकीय नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या विकास कामात कसा अडथळा निर्माण होईल, याकडे मात्र जास्त लक्ष असताना दिसत आहे. हिरापूर रस्त्यावरील नागरिकांच्या मागणीने आ.मंगेश चव्हाण यांनी मूलभूत सुविधा तथा नागरी सेवा पुरविणे या मागणीचे गांभीर्य ओळखून आजपर्यंत ३० ते ४० वर्षापासून रस्ता, गटार, उद्यान होत नसल्याने जातीने लक्ष घालून भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला. त्या अनुषंगाने न.पा.अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या मागणीप्रमाणे कागदपत्राची पूर्तता ही केली. पण कामास कसा अडथळा निर्माण होईल व विकास काम कसे थांबेल मतदार कसा संभ्रमात पडेल, याची काळजी घेतली गेली असे लक्षात आले आहे.
आ.मंगेश चव्हाण यांनी हिरापूर रस्त्यावरील दोन ओपन स्पेस मिळून एक कोटी दहा लाख रुपये असा भरघोस निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार संबंधित ठेकेदारास न.पा.चाळीसगावकडून ९ जून २०२३ रोजी कार्यादेश पत्र निघाले. त्यावर ठेकेदार काम सुरु का करत नाही. म्हणून स्थानिकांनी चौकशी केल्यावर लक्षात आले की, ज्या सर्वे नंबर ३१५/५ ओपन स्पेस छत्रपती शिवाजी महाराज नगर हिरापूर रोड याठिकाणी ५० लाख रुपये मंजूर झाले आहे. त्या लेआउटमधील ओपन स्पेसची डिझाईन तर खरी आहे पण वर्क ऑर्डरमध्ये सर्वे नंबर चुकीचा टाकला आहे, तो असा सर्वे नंबर ३१५/१/२/३ असा सर्वे नंबर कोठेही शहरात नाही, असे लक्षात आले.
केलेली दुसरी चूक इच्छादेवी नगर हिरापूर रोडमधील ६० लाख रुपये मंजूर ओपन स्पेसला तर स्थानिक सर्वे नंबर ३१२/२/४/५ मधील रहिवाशांच्या मागण्याने आ.मंगेश चव्हाण यांनी निधी उपलब्ध करून दिला. त्या ओपन स्पेसवर न.पा.चाळीसगावकडून संबंधित ठेकेदारास लाईन आऊट दिली जात नाही. यात पण काहीतरी घोळ केला असावा, अशी स्थानिकांना शंका आहे. शहरात इतर ठिकाणी प्रगतीपथावर काम सुरु असताना हिरापूर रस्त्यावरच का नगरपालिका अधिकाऱ्यांकडून कागदोपत्री रोष व्यक्त केला जातो, यात शंका आहे. शहरात १८ ओपन स्पेस हे नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत होत आहे. या कामाची मुदत ही कार्यादेश दिल्यापासून ९ जून २०२३ ते १२ महिन्याचे करणे आहे.
तसेच निधी मिळावा म्हणून आ.मंगेश चव्हाण यांचे विश्वासू कार्यकर्ते यास कामाचे श्रेय मिळायला नको म्हणून तर हा प्रकार सुरु आहे, असे असेल तर जो काम करतो त्याला मतदार बघत आहे. येत्या न.पा. निवडणुकीत विकास कामात आडकाठी टाकणाऱ्यांना मतदार जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा सूर हिरापूर रस्त्यावरील स्थानिक मतदारांचा निघत आहे.