‘घर घर संविधान’ अभियानांतंर्गत राबविले विविध उपक्रम
साईमत/पारोळा/प्रतिनिधी
येथील लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित सीबीएसई बोहरा सेंट्रल स्कूल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, संचालक श्वेता बोहरा, शाळेचे प्राचार्य शोभा सोनी, ॲडमिनिस्ट्रेटर वीरेंद्र सखा तसेच उपस्थित शिक्षकवृंद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधान प्रास्ताविकेचे पूजन करुन माल्यार्पण केले.
भारतीय संविधानाबाबत विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करून संविधानाचा, लोकशाहीत होणारा उपयोग व महत्त्व पटवून दिले. प्राचार्य शोभा सोनी यांनी बाबासाहेबांची जीवनशैली त्यांचे बुध्दीकौशल्य व आपला भारत देश कायदा व सुव्यवस्थेत चालावा, यासाठी दिलेली देणगी म्हणजे आपले भारतीय संविधानाबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. असे आदर्श समोर ठेवून आपल्या शैक्षणिक जीवनात वाटचाल करण्याबाबत मार्गदर्शन केले. संविधान दिनानिमित्त शाळेत ‘घर घर संविधान’ अभियानांतर्गत भाषण, वक्तृत्व व लेखन स्पर्धांचे आयोजन केले होते. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.