साईमत मुंबई प्रतिनिधी
राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. दादा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्याच्या हरोबर राष्ट्रवादी चे बडे नेते ही सरकार मध्ये गेल्याने आचार्य व्यक्त केले जात आहे .
सध्याच्या घडीला राज्याच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होत आहे. राजभवनामध्ये अजित पवार दाखल झाले. आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली आहे. काही वर्षांपूर्वी राजाच्या राजकारणात अशाच प्रकारचा भुकंप झाला होता. त्यात पुन्हा एकदा धक्कादायक बाब समोर आली आहे. यावेळी देखील विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या या नव्या खेळीविषयी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी त्यावर बोलणे टाळले. यामध्ये आमदार नरहरी झिरवळ, धनंजय मुंढे, अमोल मिटकरी यांचे नाव घ्यावे लागेल. खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवारांच्या निर्णयाविषयी विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सरळ नो कमेंटस असे सांगितले. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
नेटकऱ्यांनी तर अजित दादांचा दरारा इतकी कुणीही आमदार, खासदार या परिस्थितीवर बोलण्यास तयार नाही.अशा प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादीच्या कित्येक आमदारांना यासगळ्या प्रकाराविषयी माहिती नसल्याचे समोर आले आहे.
यासगळ्यात एक गोष्ट पुन्हा समोर आली आहे ती म्हणजे जर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर मुख्यमंत्रीपदी कोण असणार याची. हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या ९ आमदार शपथ घेतली आहे. त्यामुळे येत्या काही वेळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवारांनी का केले बंड
दरम्यान, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष केल्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. तर ते कधीही भाजपसोबत जाऊ शकतात असं सांगण्यात येत होतं. अजित पवार यांनी मला पक्षाची जबाबदारी द्या, विरोधीपक्षनेते पदावरून मला मुक्त करा असं राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितलं होतं.
त्यासाठी अजित पवारांनी १ जुलै पर्यंत अल्टीमेटम दिला होता. पण पक्षाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे अजित पवार नाराज होते. या सगळ्या घडामोडीनंतर ते आता फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.
दरम्यान, पटना येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीत शरद पवार यांनी जायला नको होतं अशी इच्छा अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांची होती. पण शरद पवार हे या बैठकीला हजर राहिल्यामुळे आमदार नाराज होते असंही सांगण्यात येतंय.
अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ३० ते ४० आमदारांचा पाठिंबा असून त्यांच्यातील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील ही सर्वांत मोठी अपडेट आहे. तर या शपथविधी सोहळ्याला शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याची माहिती समोर आली असली तरी या मध्ये पवारांचे काही षडयंत्र तर नाही ना . या बद्दल चर्चा होत आहे .