साईमत चाळीसगाव प्रतिनिधी
शहरातील भडगाव रोडावर हॉटेल मनसुख याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री 3 वाजेच्या सुमारास ही आग लागली असून,अगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे कळते.या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.मात्र हॉटेल मध्ये असलेल्या 7 लोकांना वाचविण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.
रात्री भडगाव रोड वरील हॉटेल मनसुख ने शॉर्ट सर्किटमुळे पेट घेताच येथे असलेल्या जनरेटर या कॉम्प्रेसर चा स्फोट झाल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. अशा परिस्थितीत स्वतःची जीवाची परवाना करता नाईट ड्युटीवर असलेले पीएसआय गणेश सायकर,पोलीस हवालदार अजय पाटील, नितीन वाल्हे, संदीप पाटील, पोलीस शिपाई दीपक चौधरी, ज्ञानेश्वर पाटोळे, समाधान पाटील, विलास पवार, प्रवीण पवार, राहुल नारेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाचविले 7 लोकांचे प्राण वाचविले आहे.
फायर ब्रिगेड ने देखील शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आणि परिसरातील आजूबाजू असलेल्या इमारतींना नुकसान होण्यापासून सुरक्षित केले. पोलिसांनी लोकांना वाचविण्यासाठी केलेले धाडस आणि फायर ब्रिगेड ने केलेले शर्थीचे प्रयत्न यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.आणि प्रशासन नागरिकांच्या सुरक्षितेसाठी सदैव तत्पर असल्याचे दिसून आले आहे.
आगीत जखमी
पीएसआय गणेश सायकर आणि त्यांची टीम ही आगीतून नागरिकांना बाहेर काढतांना आगीच्या झळा लागल्याने पीएसआय सायकर यांना आगीने भाजल्याने दुखापत झाली होती. त्याच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.तसेच या आगीत मयूर लक्ष्मण कुमावत वय 32 वर्ष व सुरेश पोपट महाजन वय 46 वर्ष हे दोन्ही भाजल्यामुळे देवरे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची देखील प्रकृती स्थिर असल्याचे कळते.या आगीत गाईचं वासरू देखील जखमी झालेलं आहे.
