९ बाटल्या विदेशी दारु जप्त चोरी पकडली गुन्हा दाखल
साईमत / भुसावळ/ प्रतिनिधी –
सावदा येथील सहकारी दुध उत्पादक संस्थेत विदेशी दारु विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर सावदा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत संस्थेच्या मागील रुममधून ७५० एमएलच्या ९ बाटल्या विदेशी दारु जप्त करण्यात आल्या आहेत.
सावदा पोलिस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे अंमलदारांसह दोन पंचासमक्ष छापा टाकला. तपासात आढळले की, दारु विक्रीसाठी ठेवलेली ही ९ बाटल्या संस्थेतील क्लर्क नितीन रामकृष्ण बेंडाळे यांनी आणले होत्या. पोलिसांनी बेंडाळे विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ ई नुसार गुन्हा नोंदवला आहे.
सध्या तपासात हेही पाहिले जात आहे की, या दारु विक्रीमध्ये संस्थेच्या संचालक मंडळाचा काही सहभाग आहे का. कारवाई सावदा पोलिसांचे सपोनि विशाल पाटील, पोउनि अमोल गर्जे, पोहेकॉ १२३९ उमेश पाटील, पोना २४७४ जाकीर मन्सुरी आणि पोकॉ ३२३ मयुर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सावदा येथील ही घटना सहकारी संस्थांमध्ये दारुच्या अनधिकृत विक्रीविषयी गंभीर चिंता व्यक्त करते. स्थानिक प्रशासनाने अशी कारवाई गंभीरपणे घेतल्याचे दिसून येते, आणि पुढील तपासामध्ये दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे.
