Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली
    क्राईम

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    saimatBy saimatMarch 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ७९ हजारांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त, साकरीत सापळा

    साईमत भुसावळ  प्रतिनिधी

    तालुक्यात अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश बाबुराव माळी (वय ३५, रा. सिध्देश्वर नगर, वरणगाव) हा अॅक्टिव्हावर  क्र. एम.एच.१९ डी.डी.६९१२ वरून भुसावळकडून साकरीकडे अवैध दारू वाहतूक करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. यावरून पोलिस पथकाने साकरी गावाजवळ सापळा रचला.

    सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन आल्यावर पोलिसांनी थांबवून तपासणी केली. तपासणीत अॅक्टिव्हावर ठेवलेल्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात दारू सापडली. आरोपीकडे दारू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

    या कारवाईत एकूण ७९,१९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संकेत झांबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, योगेश माळी याला अटक करण्यात आली आहे.

    ही कारवाई पोलिस कर्मचारी रमन सुरळकर, योगेश पालवे, अविनाश टहाकळे आणि किरण तायडे यांनी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Navapur:भीषण अपघात! पानबारा येथे बोलेरो पलटी, पाच मजूर जखमी

    March 22, 2026

    Chop : घरगुती त्रासाचा फटका भावाने भावाचा दगडाने ठेचून खून केला

    March 22, 2026

    Bhusawal:प्रेमविवाहाचा संताप भुसावळात तरुणावर अमानुष अत्याचार

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.