कुंडचे पोलीस पाटील अपघातात जागीच ठार

0
9

साईमत/ न्यूज नेटवर्क/मलकापूर :

तालुक्यातील कुंड बु. येथील रहिवासी तथा पोलीस पाटील नामदेव तुकाराम कवळे (५८) हे कुंड फाट्यावरून मलकापूरकडे येण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर यादगार हॉटेलजवळ रस्ता ओलांडताना चार चाकीने उडविल्याने ठार झाल्याची घटना सोमवारी, १ जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

येथील कुंड बु. रहिवासी तथा पोलीस पाटील नामदेव तुकाराम कवळे (वय ५८) हे मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर येऊन कुंड बु. फाट्यावरून महामार्ग ओलांडला. त्यानंतर हाॅटेल यादगारनजीक वाहन पकडण्यासाठी ते चालत होते.
मुंबईवरून नागपूरकडे जाणारी चारचाकी (क्र.जीजे-१५, बिएफ-२५६४) भरधाव येत कवळे यांना उडविले. या घटनेतील धडक एवढी भीषण होती की, ते अक्षरशः फुटबॉलसारखे हवेत उडून खाली कोसळले. डोक्यात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here