Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»पोलीस विभागाने २०२३ मध्ये जिल्ह्यातील ११ हजार ९२० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
    क्राईम

    पोलीस विभागाने २०२३ मध्ये जिल्ह्यातील ११ हजार ९२० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

    SaimatBy SaimatJanuary 18, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    समाजात शांतता प्रस्थापीत करणे, कायदा – सुव्यवस्था राखणे व गुन्हेगारांवर वचक बसावा. हातभट्टी वरील अनधिकृत दारूविक्रीला पायबंद बसवा यासाठी दारूबंदी विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा पोलीस विभागाकडून उगारण्यात येतो. यासाठी पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यात २०२३ या वर्षात ११हजार ९२० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना वचक बसला आहे. २०२१ व २०२२ या वर्षाच्या तुलनेत ही प्रतिबंधात्मक कारवाईत यावर्षी वाढ झाली आहे.

    गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी पोलीस व महसूल यंत्रणेकडून सीआरपीसी १०७, १०९ व‌ ११० अन्वये तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ९३ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असते. २०२१ या वर्षात ८८०६ व २०२२ या वर्षात ९०८३ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर‌ या‌ कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे ‌.
    जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रतिबंधात्मक कारवाई बाबत घ्यावयाच्या दक्षता याविषयावर संयुक्त कार्यशाळा ही नुकतीच घेण्यात आली आहे. सीआरपीसी १०७, १०९ व ११० मध्ये पोलीस विभागाने परीपूर्ण प्रस्ताव कसे सादर करावे. कार्यकारी दंडाधिकारी यांनी पहिला बाँड कसा घ्यावा, रोजनामा कसा लीहावा, नोटीसा कशा काढाव्यात, शेवटाचा बाँड किती दिवसात काढावा. याबाबत या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

    शासकीय कामात अडथळा आणून सरकारी अधिकारी – कर्मचारी व पोलीसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कडक प्रतीबंधात्मक कारवाई झाली पाहिजे. निवडणूक तसेच आंदोलनाच्या काळात महसूल विभागाचे कार्यकारी दंडाधिकारी व पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतिबंधात्मक कारवाई करतांना महसूल व पोलीस विभागाने समन्वय ठेवत काम करावे. अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : जळगावमध्ये सुवर्णकार समाजाचा १० वा ‘ऋणानुबंध’ वधू-वर मेळावा

    January 18, 2026

    Jalgaon : विनाकारण हल्ला: मेहरुण पुलाजवळ माजी पोलीसावर प्राणघातक वार

    January 18, 2026

    Pune-Solapur : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भाविकांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

    January 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.