पोलीसदादा हेच आमचे खरे रक्षक-दिपांजली गावीत

0
12

साईमत, नवापूर : प्रतिनिधी
पोलीस बांधव हेच खरे रक्षक असून आज खरा दिवस रक्षा करणाऱ्या पोलीस बांधवांचा आहे. आमच्या सुरक्षेसाठी सदोदीत तत्पर असणारे आमचे हे बांधव, 24 तास आमच्या सर्वांच्या रक्षणासाठी झटणारे पोलिस बांधव यांना राखी बांधताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन दिपांजली गावीत यांनी केले.
मातोश्री बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नवापुर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. याव्ोळी मातोश्री बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा दिपांजली गावीत व संस्थेच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी पोलीस निरिक्षक ज्ञानेश्‍वर वारे, उपनिरीक्षक मनोज पाटील, जगदीश सोनवणे, अ.स.ई युवराज परदेशी संपुर्ण पोलिस प्रशासन उपस्थित होते.
दिपांजली गावीत यांनी सर्व पोलीस बांधवांचा सर्वप्रथम शाल व पुष्प देऊन सत्कार केला व राखी बांधून हा रक्षेचा सण भावनिक होऊन साजरा केला. रक्षाबंधनाचा मुहूर्त प्रथम आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या सर्व पदाधिकारी महिला यांच्या हस्ते राखी बांधुन साजरा केला असल्याचेही गावीत म्हणाल्या. प्रसंगी तालुका अध्यक्ष सोनल चौधरी, तालुका सचिव- रिता वळवी, प्रियतमा राऊत,किर्ती वसाव्ो,रुषाली वसाव्ो,ऊषा वळवी, दिलु मावची,चंदना गावीत, अनिता कोतवाल,बबिता गावीत, सुमित्रा वसाव्ो आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here